आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

बदनापूर पंचायत समिती अंतर्गत जागतिक दिव्यांन दिन समान संधी दिन उत्साहात साजरा.

जागतिक दिव्यांन दिन समान संधी दिन उत्साहात साजरा.

बदनापूर प्रतिनिधी :- बदनापूर येथे गट साधन केंद्र पंचायत समिती मध्ये ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन समान संधी दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला आहे.३ डिसेंबर ते १० डिसेंबर हा सप्ताह जगभरामध्ये समता सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो

त्या अनुषंगाने दिव्यांन विद्यार्थ्यांना समाजामध्ये समान संधी मिळावी त्यांच्या हाक्काचे संरक्षण व्हावे व त्यांना समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून सन्मानाने जीवन जगता यावे या संबंधी जाणिव जागृती निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धा, रॅली,दिव्यांग व्यक्तींच्या यशोगाथा, शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.गट साधन केंद्र पंचायत समिती बदनापूर अंतर्गत जिल्हा परिषद व खाजगी शाळेत ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन समान संधी दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला

Share now