आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

माध्यमिक विद्यालय देवनांदरा व D.J.P.S. फार्मसी कॉलेज व ऍग्री कॉलेज पाथरी येथे ,सायबर सिक्युरिटी व जनरल अवेअरनेसचा उपक्रम

पाथरी येथे ,सायबर सिक्युरिटी व जनरल अवेअरनेसचा उपक्रम

पाथरी प्रतिनिधी. पाथरी शहरातील माध्यमिक विद्यालय देवनांदरा,फार्मसी कॉलेज व ऍग्री कॉलेज पाथरी येथे ‘सायबर सिक्युरिटी व जनरल अवेअरनेस उपक्रम’ आज दिनांक. 28 वार सोमवार रोजी असंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य इंगोले ,पोलीस निरीक्षक गणेश कराड महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन ली.एल.एल.सी. चे जिल्हा प्रतिनिधी अमोल गाडे सर,अक्षय कॉम्प्युटर्स चे संचालक तुकाराम पौळ राज्यात वाढती सायबर गुन्हेगारी चिंतेची बाब आहे. सर्वात धकादायक म्हणजे सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या आता विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत.

यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती व्हावी, यासाठी शहरातील प्रसिद्ध अक्षय कॉम्प्युटर्स चे संचालक तुकाराम पौळ यांच्यामार्फत गेल्या दोन वर्षात कॉम्प्युटर्स नॉलेज चे वेगवेळ्या माध्यमातून कार्यक्रम झाले.प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात स्मार्टफोन प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्या धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालय व इतर सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सायबर सिक्युरिटी

व जनरल अवेअरणेस चा उपक्रम राबवून सायबर गुन्ह्याबद्दलचे अवेरणेस निर्माण करण्याचा एम.के.सी.एल चा मानस आहे. जेणेकरून विद्यार्थी स्वतःचे त्यांच्या परिवाराची तसेच आजूबाजूच्या लोकांचे या गुन्ह्यापासून काही प्रमाणात बचाव करू शकतील.

आज उद्देश ठेवून आज दि. २8 रोजी शहरातील देवनांदरा माध्यमिक विद्यालय व फार्मसी व ऍग्री महाविद्यालय येथे उपक्रम राबविण्यात आले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य इंगोले सर यांनी भाषणामध्ये आजचे जग हे संवेदनाहीत बनले आहे. आणि विद्यार्थ्यांनी याबाबत जागृत राहावे असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर,काळे

सर,गायकवाड सर,पिंपळगावकर सर,कुसळे सर,फार्मशी कॉलेज चे प्राचार्य डॉ.इंगोले सर,ऍग्री कॉलेज चे प्राचार्य जैस्वाल सर,अनिल कोल्हे सर,कोळसे सर व इतर सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

Share now