आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

मोबाईल, कॉम्प्युटर अतिरेक वापराने भावी पिढी दृष्टीदोषची शिकार

संपादक अहमद अन्सारी. पाथरी परभणी.आज कालच्या लहान वयापासून तरुण पिढीकडे मोबाईल इंटरनेट कॉम्प्युटर या वस्तूंच्या वापराचे वाढते प्रमाण अतिरेकाकडे घेऊन जात असल्याकारणाने बाल्य पिढी दृष्टीदोष चे शिकार बनत चालले आहेत यासाठी आपल्या पाल्य ची पालक वर्गाने खबरदारी घेण्याची गरज आहे.सोनपेट दिनांक ६ डिसेंबर २०२२ वार मंगळवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव 2022 वर्ष अंतर्गत ,

सोनपेठ शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिखेड येथे ब्रह्मकुमारीज शाखा सोनपेठ आयोजित व नगरपरिषद सोनपेठ तसेच रोटरी सॅटॅलाइट क्लब सोनपेठ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय ब्रह्मकुमारी मीरा दीदी देविदास वाडकर ,ब्रह्माकुमारी सोनपेठ सेवा केंद्र संचालिका व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था, यांच्या वाढदिवसानिमित्त व महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिखेड येथील विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय नेत्र तपासणी शिबिर नेत्रतज्ञ डॉक्टर अमोल सातभाई यांच्या सहकार्याने आयोजित केले आहे. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे

अध्यक्ष – मा. श्री. सारंग चव्हाण तहसीलदार सोनपेठ, व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संदीप बोरकर पोलीस निरीक्षक सोनपेठ, विठ्ठल केदारे मुख्याधिकारी सोनपेठ, नागनाथ सातभाई अध्यक्ष आर्य वैश्य समाज, लिंबाजी कागदे अध्यक्ष रोटरी क्लब सोनपेठ, डॉक्टर सचिन कस्पटे बीडीएस , डॉक्टर गणेश मुंडे डॉक्टर फड, डॉक्टर सिद्धेश्वर हलगे, अधिकारी ग्रामीण रुग्णालय सोनपेठ डॉक्टर सुभाष पवार तालुका आरोग्य अधिकारी सोनपेठ, घनश्याम झंवर अनिल शेटे, बाल मुकुंद सारडा मंदिर सिंग शाहू, अरुण लांडे, सौ. मंगल कोटलवार मुख्याध्यापिका व टीचर स्टाफ तसेच सोनपेठ शहरातील सर्व पत्रकार बंधू वरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक दिवशी नेत्र तपासणी शिबिर संपन्न होणार आहे. अशी माहिती सूत्रांशी बोलताना ब्रह्माकुमारी दीदी यांनी सांगितले आहे

Share now