क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

१२ जुन जागतिक बालकामगार विरोधी दिवस

परभणी जिल्हा प्रतिनिधी. परभणी जिल्ह्यातील १२ जुन जागतिक बालकामगार विरोधी दिवसाचे औचित्य साधुन बालकामगार विरोधी जनजागृतीचा एक भाग म्हणुन परभणी जिल्हयातील सर्व हॉटेल धारक, विटभटी मालक, दुकाने, गॅरेज, बेक-या, कत्तलखाने इतर छोटया मोठया सर्व उद्योंगातील मालकांना, परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल

परभणी आपणास आवाहन करते की, १४ वर्षा खालील बालकांना सर्वच व्यवसाय व प्रक्रिय मध्ये काम करण्यास प्रतिबंध असुन, तसेच १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालाकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रिये मध्ये कामावर ठेवणे फौजदारी गुन्हा आहे.जिल्हयात कोठेही बालकामगार आढळुन आल्यास बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारीत अधिनियम २०१६ नुसार मालकास ६ महिने ते २ वर्षापर्यंत

तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान २०,००० / – (विस हजार रुपये) व कमाल ५०,०००/- रुपये (पन्नास हजार रुपये) पर्यत दंड अथवा दोन्ही शिक्षा मालकास होऊ शकतात.म्हणुन मी असे आवाहन करते की, परभणी जिल्हयात कुठल्याही आस्थापनात अथवा कोणत्याही व्यवसायात बालकामगार आढळल्यास आस्थापना मालकावर दंडात्मक कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.मी पालकांनांही कळकळीने असे आवाहन करते की,

अल्पश्या मोबदल्यासाठी आपण आपल्या पाल्याचे जिवन उधवस्त करु नका. बालपण व शिक्षण हा त्यांचा हक्क असुन त्यांना त्यापासुन वंचित ठेवु नका. तसेच मालक पालक बालक यांनी बालकामगार हया अनिष्ट प्रथेच्या उच्चाटनासाठी शासनास मदत करावी.द्या बालकांना शिक्षण व ज्ञान, घडतील नागरिक उद्या सुजान.असे अहवान परभणी जिल्हा अधिकारी आंचल गोयल. परभणी सरकारी कामगार अधिकारी मानगावकर. सौदागर सर. सुभाष पेरके. शेरखान पठाण यांनी केले आहे

Share now