ताज्या घडामोडीमनोरंजन

25 वर्षांनी आले वर्ग मित्र एकत्र1997-98 बॅचचा रंगला स्नेह मिलन सोहळा

10.वी वर्गातील मित्र एकत्र1997-98 बॅचचा रंगला स्नेह मिलन सोहळा

मानवत / रियाज शेख

मानवत प्रतिनिधी. मानवत : शहरातील नेताजी सुभाष माध्यमिक विद्यालयात सन 1997-98 मधील इयत्ता दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या  स्नेहमेळाव्याचे आयोजन 4 जून रोजी करण्यात आले होते.तब्बल 25 वर्षांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा आगामी काळात विविध उपक्रम पुढील काळात राबविण्याचा मानस विद्यार्थ्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

शहरातील नेताजी सुभाष माध्यमिक विद्यालयात पहिल्या सत्रात सकाळी दहा वाजता 1997 – 98 बॅचचे विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले होते. सकाळी शाळेची घंटा वाजवून परिपाठासाठी या सर्व विद्यार्थ्यांना उभे करण्यात आले राष्ट्रगीत परिपाठ झाल्यानंतर तत्कालीन शिक्षकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक गोपीकिशन सिखवाल, विद्यमान मुख्याध्यापक नंद कुमार शिसोदिया,डी बी नेवरेकर एस आर रनेर, एम ए चंदाले, एकनाथ गुणाले, केशव शिंदे,यू आर थोबाळ,एकनाथ गुणाले, शिवराज यालमाटे,आंबदास बंडे,प्रकाश काकडे,प्रल्हाद पुरी, विनायक कुलकर्णी,पी के बरकूले आर एस हेंडगे,सदाशिव होगे, एम टी मोरे,सी डी कच्छवे बी जे झोल उपस्थित होते.

सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळीसर्व शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देताना आपण कोणकोणत्या क्षेत्रात काम करत आहोत व कसे यशस्वी झालो याविषयीची माहिती सर्वांना दिली.विविध क्षेत्रात आपले विद्यार्थी कार्यरत असून काही उच्च पदावर अधिकारी असल्याचे ऐकून शिक्षक अगदी भारावून गेले होते. शिक्षकांनी आपल्या मनोगतात मार्गदर्शन करताना

आजही तुम्ही कसे संस्कारक्षम जीवन जगले पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. दुसऱ्या सत्रात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या या स्नेह सोहळ्यात बालपणीच्या आठवणीं काढण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध पांडे, सत्यशील धबडगे, प्रस्ताविक संदीप जवळेकर आभार रवी कांगणे यांनी

मानले.बॉक्स अन शिक्षक ही जुन्या आठवणीत रमले.1997- 98 बॅचच्या वर्ग मित्रांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या या स्नेह मिलन सोहळ्याने तत्कालीन शिक्षकही भारावून गेले. विद्यार्थी घडवल्यानंतर तो यशस्वी झाल्याचे पाहून आणि अशा आनंदाच्या क्षणाला निमंत्रण मिळाल्याने जुन्या आठवणी काढून शिक्षकही त्या आठवणीत रमले. सेवानिवृत्तीचे जीवन जगताना पुन्हा प्रेमाचा डोस मिळाल्याचे शिक्षक जी एस सीखवाल, यू आर थोमबाळ, केशव शिंदे, आर एस हेंडगे यांनी सांगितले.

Share now