ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

जायकवाडी धरणात २८ टक्के पाणी अंबड व घनसावंगीच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली.

२८ टक्के पाणी अंबड व घनसावंगीच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली.

जालना प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मधील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न पडल्याने जायकवाडी धरणात केवळ २८ टक्के एवढाच जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत धरणात १२ टक्के जलसाठा होता.

अंबड व घनसावंगी तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली असतानाच जायकवाडीतील अत्यल्प पाणीसाठा शेतकन्यांची चिंता वाढविणारा आहे.अंबड व घनसावंगी तालुक्यात जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर ४१ हजार ९९० हेक्टर जमीन ओलिताखाली येते. डाव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. औरंगाबाद जिल्हीयां सह जालना जिल्हयात वरुणराजाने पाठ फिरवल्याने जायकवाडी धरणातील पाणी पातळीत वाढ झालेली नाही. जायकवाडी धरण या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असून धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतकन्यांची चिता वाढली आहे. जून महिना कोरडा


डाव्या कालव्यांतर्गत • ते १२२ किलोमीटरपर्यन्त ४६ चान्या आहेत. या चाऱ्यातील पाण्यावर ४१ हजार ९९० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. पावसाचे जून व जुलै हे दोन महिने उलटूनही अपेक्षित पाऊस न पडल्याने ४१ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकाबरोबर उसाचे पिकही धोक्यात येणार असल्याने चिंता वाढली आहे.गेल्यानंतर जुलै महिन्यातही अपेक्षित पाऊस न पडल्याने रिमझिम पावसावर पिके तग धरून आहेत. अंबड व घनसावंगी या दोन्ही तालुक्यांतील छोटे प्रकल्पात पावसाअभावी नगण्य पाणीसाठा आहे. मोठा पाऊस न पडल्यास गंभीर संकट कोसळणार असल्याची शक्यता आहे.

Share now