ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा. आंचल गोयल


परभणी जिल्हा प्रतिनिधी. यावर्षी जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याने गणेश भक्त देखील उत्साहात आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची जबाबदारी ही वाढली असुन, दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा असे अवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.


गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहवी याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयेाजित शांतता समितीच्या बैठकीत श्रीमती गोयल या बोलत होत्या. यावेळी पोलीस अधिक्षक जयंत मिना, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची उपस्थिती होती.


यावेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या की, गतवर्षी प्रमाणे यावर्षी ही मनपा प्रशासनाने शहरातील घरोघरी व मंडळातील विसर्जनासाठी गणेशमुर्तीचे संकलन करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील मनपा प्रशासनाला याकरीता सहकार्य करावे. तसेच शहरातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करुन मनपाला रस्त्यांची व पथदिव्यांची दूरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी मंडळाना लागणाऱ्या सर्व परवानगीसाठी मनपा प्रशासनाने एक खिडकी योजना सुरु केली आहे. तसेच समाज माध्यमांवर कोणाची ही भावना दुखविणारे संदेशाची देवाण-घेवाण करु नये. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही सर्व नागरिकांनी उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा.
पोलीस अधिक्षक जयंत मीना यावेळी म्हणाले की, दोन वर्षानंतर यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी या उत्सहात कुठल्याही प्रकारचे जातीय व धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेत हा उत्सव साजरा करावा. तसेच उत्सवाच्या कालावधीत डिजे किंवा इतर संगीताने ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. गणेश मंडळांनी आपल्या मंडळात कुठलेही गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच मंडळातील गणेश भक्त युवकांनी देखील अतिउत्सहात आपल्या हातून गैरकृत्य होणार नाही याची काळजी घ्यावी.

जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी गैरकृत्य किंवा घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीसांना द्यावी. अवैध दारू विक्रेत्यांवर पोलीसांमार्फत कारवाई करण्यात येत आहे. यावर्षीचा गणेशोत्सव शांततेत व उत्सहात साजरा व्हावा यासाठी पोलीस, महसूल आणि नगर प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी तयार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखुन गणेशोत्सव साजरा करावा.


यावेळी मनपा आयुक्त देविदास पवार म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा करण्याकरीता मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील रस्त्यांची व पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. तसेच गणेश विसर्जनासाठी घरोघरी जाऊन गणेश मुर्ती संकलीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मंडळना लागणाऱ्या सर्व परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात आली असल्याची त्यांनी माहिती दिली.


यावेळी बैठकीत गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांनी देखील आपल्या सूचना प्रशासनासमोर मांडल्या. बैठकीस विविध विभागाचे विभाग प्रमुख, गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


Share now