आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

पाथरी नगर परिषद येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या आंदोलन

परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी दिनांक. 28/08/2018 दिनांक. 25/10/2021. दिनांक. 21/12/2021 मागण्या प्रमाणे वेळोवेळी विनंती अर्ज देवून पाठपुरावा केला होता परंतु दिव्यांगाच्या अर्जाचा आपल्या कार्यालयाने गांभीर्याने विचार केला नाही ही अत्यंत दुरदेवाची व खेदजनक बाब आहे.

राज्यशासनाच्या ध्येयधोरणा नुसारच आम्ही आमच्या मागण्या आपणा समोर सादर करत असतो परंतु अमलबजावणी दखल घेतली जात नाही. न.प. च्या उत्पनाच्या 39% वाटा हा दिव्यांगाच्या कल्याणासाठी यायावयास पाहिजे परंतु आपल्या कार्यालयाकडून या टक्केवारी प्रमाणे दिव्यांगाना लाभ मिळत नाही असे याही वर्षापासून ज्ञानवत आहे.

नगर परिषद प्रशासन हे आमच्या कल्याणाचे प्रभावी माध्यम आहे. जे राज्य शासनाच्या आदेशानुसार काम पाहत असते परंतु दिव्यांगाच्या अपेक्षांची आपल्या कार्यालयाकडून निराशा केली जात आहे. त्यामूळ जेथे तिची संपते तेथे क्रांतीचा उदय होतो. या म्हणी प्रमाणे आम्ही दिव्यांग उपोषणाचा मार्ग अवलंचबीत आहोत. दिनांक. 21 नोव्हेंबर 2022 पासुन. काळया फिती लावून विरोध. थाळीवाजवून आंदोलन. बाँब मारो आंदोलन.

भिक मांगो आंदोलन आशा प्रकारचे विविध दररोज एक एक आंदोलन नगर परिषद कार्यालया समोर दिनांक. 21 नोव्हेंबर 2022 पासून करत आहोत व हे आंदोलन शांततेच्या मार्गाने असेल प्रशासनाने या आंदोलनाचे गांभिर्याने दखल घेऊन अपंगला न्याय दियावा

Share now