आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

वाघाळा प्राथमिक अरोग्य केंद्रात ७६ कुटूंब नियोजन

संपादक अहमद अन्सारी. पाथरी:-तालुक्यातील वाघाळा येथील प्राथमिकआरोग्य केंद्रात मंगळवार २९ नोव्हेंबर रोजी ७६ कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया संपन्न झाल्या. वाघाळा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ सिराज,वैद्यकीय अधिकारी डॉ सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी सकाळी बिनटाक्याच्या ७६ कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया संपन्न झाल्या.

या महिण्यातील हे तिसरे कुटूंब नियोजन शस्रक्रिया शिबिर होते. या पुर्वी दोन शिबिरात ६५ कुटूंब नियोजन शस्रक्रीया केल्या नंतर मंगळवारी वाघाळा प्राथमिक आरोग्यकेंद्रात विक्रमी ७६ शस्रक्रीया संपन्न झाल्या.या शिबिरात वाघाळा गावचे सरपंच बंटी पाटील यांनी खास करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची व्यवस्था म्हणून पिण्या साठी आरओ पाण्याची व्यवस्था करून नातेवाईकांना झोपण्या साठी व्यवस्था केली

रात्री ऊशिरा पर्यंत त्यांनी रुग्णालयात उपस्थित राहून सर्वांशी सुसंवाद साधत काही कमी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करून उपस्थित नातेवाईकांना फोन नंबर दिला. रुग्णांच्या नातेवाईकांना माजी चेअरमन माणिकआप्पा घुंबरे यांनी बिस्कीट,चहाची सोय केली. या सोबतच माजी ग्रा प सदस्य पंढरीनाथ पवार यांनी भल्या पहाटे रुग्णांच्या सर्व नातेवाईकांना चहापणाची व्यवस्था केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्रक्रीया होत असतांना. वाघाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांनी सर्व रुग्णांची योग्यती खबरदारी घेत सर्वांची स्वत: काळजी घेत रुग्णांना कुठला ही त्रास होणार नाही याची काळजी घेतली.

गत दोन वेळच्या शत्रक्रीया या बाभळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वाघाळा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडल्या. या शस्रक्रीया डॉ मुंडे यांच्या हस्ते पार पडल्या. या शस्रक्रीया सकाळी सव्वा सात वाजता सुरू होऊन पावने दहा वाजता संपन्न झाल्या. रुग्नांना शस्रक्रीये नंतर वाघाळा आणि बाभळगाव प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या अॅम्बूलन्स व्दारे त्यांचा घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. या शिबिरा साठी आरोग्य सहायक पवार,आरोग्य सहायीका किवंदे,आरोग्य सहायक बौत आणि वाघाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले

Share now