ताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

सरपंच बंटी पाटलांच्या हस्ते वाघाळा येथे साडेचार किमी अंतराच्या पानदान रस्तेच्या कमाचा शुभारंभ.

संपादक अहमद अन्सारी. पाथरी:-तालुक्यातील वाघाळा येथील नऊ पानंदरस्ता कामासाठी मातोश्री पाणंद रस्ते योजने साठी वाघाळा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बंटी पाटील यांनी शासनाला ठरावा व्दारे मागणी केलेली आहे.यातील साडेचार किमी अंतराच्या पाच पाणंद रस्त्यांना मंजूरी मिळाली असल्याने शुक्रवार २ डिसेंबर रोजी या पाचही

पाणंद रस्ता कामाच्या लोकसहभागातील माती कामाला सरपंच बंटी पाटलांच्या हस्ते नारळ वाढऊन शुभारंभ करण्यात आला.या वेळी पत्रकार धनंजय देशपांडे,नागनाथ कदम,रमेश बिजुले,गजानन घुंबरे,हादगावचे उपसरपंच विजय नखाते,जुबेर चाऊस, डॉ मधुकर घुंबरे,हभप धनंजय महाराज मोकाशे,आशोकराव जाधव,रुस्तुमराव घुंबरे,सुदाम आप्पा घुंबरे,बालासाहेब घुंबरे,तुकारामजी बोबडे,राम

नागरगोजे,सुरेश होके,पिंटू उर्फ अशोक घुंबरे,शेख ताज,प्रल्हाद घुंबरे,राजू आबा घुंबरे,रणजीत घुंबरे यांची उपस्थिती होती.वाघाळा या गावच्या या पाणंद रस्त्या मुळे शेतक-यांना पावसाळ्यात मोठ्या अडचनींचा सामना करावा लागत असे.पाणी असून ही बागायती शेती करणे अवघड होते. गेली कित्तेक दिवसाची ही मागणी सरपंच बंटी पाटलांनी निकाली काढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थां मधून आनंद व्यक्त होत

असून.आजच्या उदघाटन कार्यक्रमा साठी मोठ्या संखेने ग्रामस्थांची उपस्थिती दिसून आली.लोकसहभागातील माती कामा नंतर पुढील काही महिण्यात या रस्त्याचे मजबुतीकरण करून देणार असल्याचे सरपंच बंटी पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले. या साडेचार किमी अंतराच्या रस्त्यात जायकवाडी वसाहत ते भगवान शेळके यांच्या

शेतापर्यंत,दलीत वस्ती ते वझुर पानंदरस्ता,वाघाळा फुलारवाडी रस्ता अशोक सोनेराव घुंबरे यांच्या शेता पर्यंत करण्यात येणार असल्याचे सरपंच बंटी पाटील यांनी सांगितले.छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत जेष्ठ नागरीक रुस्तुमराव घुंबरे अर्णण करत अभिवादन करून हा पाणंद रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी वाघाळा गावातील जेष्ठ नागरीकां सह शेतकरी,युवक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Share now