आम मुद्देताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

पोलीस स्टेशन मौजपुरी यांच्या वतीने जातीय सलोखा अभियान अंतर्गत रक्तदान शिबीरात ८२ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

जातीय सलोखा अभियान अंतर्गत रक्तदान शिबीरात ८२ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

जालना प्रतिनिधी :- दिनांक .१२ सोमवार रोजी मौजपूरी पोलीस स्टेशन यांच्या वतीने जातीय सलोखा अभियाना अंतर्गत रक्तदान शिबीर रामनगर पोलीस चौकी रामनगर सा.का.येथे आयोजित केले होते.जलकल्याण रक्तकेंद्र जालना रक्तपेढी यांच्या सहकार्याने एकुण ८२ रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरात रक्तदान केले.

सर्व रक्तदात्यांचे पोलीस स्टेशन मौजपुरी यांच्या वतीने आभार मानले आहे.सदर रक्तदान शिबीर हे मा.पोलीस अधिक्षक श्री. अक्षय शिंदे जालना, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.बहुरे परतूर विभाग जालना, यांच्या मार्गदर्शनाखाली मौजपुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री.व्हि.एस.मोरे,पोउपनि.आर.पी.नेटके,पोहवा

देशमुख,बरडे,नागरे,हरणे,पोना/श्रीवास, देशमुख,पोकॉ/मांटे, वाघमारे, राठोड, इंगळे व इतर सर्व पोलीस स्टाफ यांनी रक्तदान शिबीराचा कार्यक्रम आयोजित करुन रक्तदान शिबीर कार्यक्रमात परिश्रम घेऊन योग्य रित्या यशस्वी केला.

Share now