ताज्या घडामोडीमनोरंजन

रीड अँड लीड फौंडेशन तर्फे आधुनिक भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका फातेमा शेख” या ग्रंथाचे विमोचन

रीड अँड लीड फौंडेशन तर्फे आधुनिक भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका फातेमा शेख” या ग्रंथाचे विमोचन

औरंगाबाद प्रतिनिधी. औरंगाबाद रीड अँड लीड फौंडेशन आणि मिर्झा वर्ल्ड बुक हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने कैसर कालोनी औरंगाबाद येथे तेलगू भाषेतील प्रसिद्ध लेखक सैय्यद नासेर अहेमद लिखित आधुनिक भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख या ग्रंथाचे विमोचन संपन्न झाले.प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत समूहाचे जेष्ठ पत्रकार श्री.खंडाळकर,प्रो.डॉ.झाकिर पठाण जेष्ठ

इतिहासकार आणि ऍड.शेख अनिस व रीड अॅड लीड फाऊंडेशन संचालक मौलाना अब्दुल कयुम नदवी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. लेखकाचा परिचय करून देतांना,नदवी यांनी लेखकाच्या विविध ग्रंथाची,सामाजिक कार्याची,विविध भाषेत भाषांतर झालेल्या त्याच्या ग्रंथांची माहिती दिली,तर तत्कालीन परिस्तिथी आणि ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले याच्या सोबत कार्य करणाऱ्या शेख फातिमा याच्या योगदानाचा विविध संदर्भ ग्रंथाच्या आधारे प्रो.डॉ.झाकिर पठाण यांनी आढावा घेतला,तर ऍड शेख अनिस यांनी मुस्लिम समाजाच्या अंतर्गत परंपरा आणि मुस्लिम महिला

याच्या विषयीची माहिती देत फातिमा शेख याच्या कार्याचे गुणगान गायिले,तर प्रमुख पाहुणे श्री खंडाळकर यानी फातिमा शेख यांच्या अनेक सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला शिवाय सावित्री माता यांच्या सोबत असलेले फातिमा चे छायाचित्र प्रत्येक घरात, शाळेत,कार्यलयात गेले पाहिजेत,राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या महामानव वाना त्रिवार अभिवादन करून लोकांची मने जिंकली.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अमानुल्लाह मोतीवाला हाईस्कूल चे मुख्याध्यापक खान जमील अहमद, ह्यमुन राईटस चे तय्यब जफर, ॲड सलीम हे मान्यवर उपस्तीत होते,शेवटी मिर्झा बुक डेपो चे मॅनेजर मिर्जा तालेब बेग यांनी सर्वांचे आभार मानलेसुत्र संचालन अबुल हसन अली केले.

Share now