आम मुद्देताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या सर्वच निवडणुका रद्द करण्यात याव्यात

ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या सर्वच निवडणुका रद्द करण्यात याव्यात

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर महाराष्ट्र शासनाने काढलेला आरक्षणा संदर्भाचा वटहुकूम रद्द केला. तेव्हा निवडणूक आयोगाने सर्वच निवडणूका रद्द करायला पाहिजे होते. पण तसे न करता विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी ओबीवर अन्याय करत या निवडणुका होत आहेत. त्यामुळेओबीसी आरक्षणाशिवाय होत असलेल्या सर्वच निवडणूका रद्द करण्यात याव्यात अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी तहसीलदार नायगांव यांची भेट घेवून एक निवेदन दिले असून त्यात. सर्वोच्च न्यायालयाने दि. ४ मार्च २०२१ रोजी ओबीसीचा इम्पिरिकल डाटा नसल्यामुळे भारतातील सर्वच ओबीसीचे आरक्षण रद्द केले. त्यानंतर ओबीसीला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासन, ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाचा वटहुकूम काढून महाराष्ट्रात होवू घातलेल्या विविध ठिकाणाच्या नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका असे एकूण जवळपास २०० ते २५० स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करुन निवडणूकीची प्रक्रिया चालू केली.

निवडणूकीची प्रक्रिया चालू असतांना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने काढलेला ओबीसी आरक्षणा संदर्भाचा वटहुकूम रद्द केला. तेव्हा निवडणूक आयोगाने सर्वच निवडणूका रद्द करायला पाहिजे होते. परंतू निवडणूक आयोगाने तसे न करता फक्त ओबीसी प्रभाग, वार्ड विभागाच्या निवडणूका रद्द करुन बाकीच्या निवडणूका घेण्यात याव्यात असे आदेश दिलेत. निवडणूक आयोगानेही असे परिपत्रक काढल्यामुळे समाजामध्ये जातीव्देष, जातीयतेढ व ओबीसी समाजावर अन्यायाची भावना प्रचंड प्रमाणात निर्माण झाली असून परिणामी त्याचा उद्रेक होवू शकतो.

तसेच निवडणूक आयोगाने भारतीय घटनेने दिलेला मुलभूत अधिकाराची पायमल्ली करुन विशिष्ट समाजाला खुश करत ओबीसी वर अन्याय करत निवडणूक घेत असून होत असलेल्या निवडणूका या ओबीसी आरक्षणासह घेण्यात याव्यात अन्यथा तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे तहसीलदार नायगांव यांचे मार्फत करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे,

पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहीम, सुर्यकांत सोनखेडकर, सोसायटीचे व्हा. चेअरमन किशनराव बोमनाळे, मनसे ता. अध्यक्ष राजेश ताटेवाड, प्रभाकर लखपत्रेवार, गजानन चौधरी, गोविंद नरसीकर, गंगाधर गंगासागरे, शाम चोंडे व गणेश नायगावकर यांची उपस्थिती होती.

Share now