ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

एकलहेरा येथे वैशालीताई घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बचत गटांच्या महिलांचा मेळावा संपन्न.

वैशालीताई घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बचत गटांच्या महिलांचा मेळावा संपन्न.

अंबड प्रतिनिधी :- घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील एकलहेरा येथे समृध्दी शुगर्स लिमिटेडच्या संचालिका वैशालीताई घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बचत गटांच्या महिलांचा मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यात वैशाली ताईंनी बचत गटांच्या महिलांसोबत संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या समस्या सोडविण्यासाठी

आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे वैशाली ताईंनी सांगितले ‌यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती पत्रक महिलांना वाटप करण्यात आले.महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी वैशालीताई कायमच आग्रही असतात आणि ते प्रश्न सुटावेत यासाठी त्या तळमळीनं प्रयत्नही करतात.यावेळी उपस्थित महिलांनी वैशालीताई यांचे स्वागत केले.यावेळी सर्व समाजातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

Share now