Uncategorizedताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ निधी द्या पावसाळी अधिवेशनात आ.कुचे यांची मागणी

शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ निधी द्या पावसाळी अधिवेशनात आ.कुचे यांची मागणी

अंबड प्रतिनिधी :- मराठवाड्यातील काही मंडळात तसेच काही सर्कलमध्ये मागील वर्षी ऑगस्ट -सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते.या सर्वांना निधी प्राप्त झाला होता, शिवाय नुकसान भरपाईचे अनुदान महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात यावे,असे शासनाचे आदेश आहेत

परंतु ऑनलाईन पद्धतीने ४०% काम पूर्ण झाले आहे.ऑनलाईन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यासाठी तहसीलदार यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना याद्या प्राप्त झाले आहे.व नियोजन विभाग मंत्रालय महाडीबीटी यांनी निधी वितरित करण्यासंबंधी आदेशित केले आहे.परंतु हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.तात्काळ अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी देण्यात यावा याकरिता आमदार नारायण कुचे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा सभागृहांमध्ये प्रश्न उपस्थित करुन पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्यांचे लक्षवेधले आहे.

Share now