ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

सत्यजीत तांबे यांनी दिली कौतुकाची पावती प्राथमिक शाळांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह बैठक

आ. सत्यजीत तांबे यांनी केलं प्राथमिक शाळांचं कौतुक

  • जळगाव जिल्हा परिषदेचं काम उत्तम असल्याचा निर्वाळा
  • मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह घेतला प्राथमिक शाळांच्या प्रश्नांचा आढावा

प्रतिनिधी,जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबाबत अनेकदा प्रश्नचिह्न उपस्थित होत असते. मात्र जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची कामगिरी अतिशय उत्तम असल्याची कौतुकाची पावती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली. जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत आ. तांबे यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील विविध प्रलंबित प्रश्न व मागण्या यांच्याबाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचाही आढावा घेतला.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी करताना आ. सत्यजीत तांबे यांनी विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती. या संघटनांनी त्या वेळी आणि आ. तांबे निवडून आल्यानंतर त्यांनी केलेल्या आभार दौऱ्यावेळी विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. या प्रश्नांवर तातडीने तोडगा निघावा, या उद्देशाने आ. तांबे यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागातील इतर अधिकारी यांच्यासह सोमवारी बैठक घेतली.

या बैठकीत मुख्याध्यापक मान्यतांबाबतचे प्रस्ताव विनाविलंब निकाली काढावेत, विज्ञान पदवीधर शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी, त्यासाठी पात्र प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव लवकर मागवावेत, आगाऊ वेतनवाढीसाठी मंजूर शिक्षकांना न्यायालयाच्या आदेशानुसार वाढ मंजूर करावी, अशा अनेक मागण्या आ. तांबे यांनी मांडल्या. जिल्ह्यात सध्या मुख्याध्यापकांनाच प्रभारी चार्ज देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच शिक्षकांपुढील कामाचे व्यापही वाढले आहेत. याकडे जिल्हा परिषदेने लक्ष द्यावे, अशी सूचना आ. तांबे यांनी केली.

प्राथमिक शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया असतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उत्तमच असायला हवा. जळगाव जिल्ह्यातील परिषदेच्या शाळांमध्ये उत्तम शिक्षणासोबतच विविध उपक्रमही राबवले जातात. विद्यार्थी विकास हे ध्येय ध्यानात ठेवून राबवलेल्या या उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेची प्राथमिक शिक्षणाची कामगिरी उत्तम आहे, असं कौतुकही आ. तांबे यांनी या वेळी केलं.



-बैठकीत मांडलेल्या मागण्या व प्रश्न
सेवानिवृत्त गट शिक्षकांचा विमा लवकर मंजूर व्हावा
-पुरस्कारप्राप्त शिक्षकांची देयके मंजूर व्हावी
-मार्च २०२३ मध्ये बचत गटाने शालेय पोषण आहारासाठी पुरवलेल्या तेलाची रक्कम अदा व्हावी प्रलंबित संचमान्यता व दुरुस्तीसंदर्भातील प्रस्ताव मार्गी लावावे दिलासा मिळालेल्या टीईटी अपात्र शिक्षकांच्या प्रस्तावावर कार्यवाही व्हावी जिल्हा अंतर्गत बदली व ऑनलाईन भरतीसंदर्भात न्यायालयाने २० जून २०२२ रोजी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी व्हावी


अधिकारी व शिक्षक संघटना यांची बैठक व्हावी
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्या अनेक रास्त मागण्याही निकाली निघालेल्या नाहीत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी तीन महिन्यातून एकदा या संघटनांच्या प्रतिनिधींसह बैठक घ्यावी, अशी सूचना आ. सत्यजीत तांबे यांनी केली. या बैठकीत आधीच ठरवलेल्या मुद्द्यांवर चर्चा होऊन त्यातून त्वरीत कार्यवाही होऊ शकते. तसेच ऐन वेळच्या काही मुद्द्यांवरही विचारविनिमय होऊन तोडगा निघू शकतो, असं आ. तांबे यांनी सुचवलं.


Share now