महाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

परभणी जिल्हा अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील नारी निर्धार मेळाव्या’ साठी महिला रवाना.

अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील नारी निर्धार मेळाव्या’ साठी महिला रवाना.

मुंबई येथे गुरूवारी अजित पवार गट राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय नारी निर्धार मेळाव्या ‘साठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांचे नेतृत्वाखाली १०० महिला खाजगी ट्रँव्हल्स ने पाथरी येथून मुंबई कडे रवाना झाल्या आहेत.


अजित पवार गट राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय नारी निर्धार मेळावा ‘ गुरूवार १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता षण्मुखानंद सभागृह सायन (पुर्व) मुंबई येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांना दिली होती.याशिवाय या महिला मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,

राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि राष्ट्रवादीचे राज्यातील सर्व मंत्री उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.असे कळविले आहे.पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पहिलाच राज्यस्तरीय महिला मेळावा होत आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांचे नेतृत्वाखाली १०० महिला बुधवारी खाजगी ट्रँव्हल्सने पाथरी येथून मुंबई कडे रवाना झाल्या आहेत.

Share now