आम मुद्देताज्या घडामोडी

धनगर समाजातील ६५० विद्यार्थ्यांकडून इंग्रजी माध्यमनिवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज

परभणी जिल्हा प्रतिनिधी.धनगर समाजातील ६५० विद्यार्थ्यांकडून इंग्रजी माध्यमनिवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित परभणी धनगर समाजातील तब्बल ६५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजी निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील सात इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये बुधवार.

२८ जून २०२३ पर्यंत प्रवेशासाठी समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, परभणी येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता पालम तालुक्यातील हिरकणी सीबीएसई स्कूल,

सर्वे नंबर २०३, पालम रोड, चोरवड, सोनपेठ येथील व्हिजन इंग्लिश स्कूल, विटा रोड आणि सायखेडा येथील मुन्सीराम तांड्यावरील कै. मानसिंग नाईक इंग्रजी प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सेलू येथील एल. के. आर. आर. प्रिंन्स इंग्लिश स्कूल, एरंडेश्वर येथील हायटेक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, एरंडेश्वर, ता. पुर्णा, गंगाखेड येथील गोल्डन ग्लोब इंग्लिश स्कूल, कोद्री रोड आणि रामरामजी लोहट पब्लिक स्कूल,

धर्मापुरी परिसर पाथरी रोड परभणी येथील अशा सात शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये व्हिजन इंग्लिश स्कूल, विटा रोड येथे केवळ ५० तर इतर सर्व शाळांमध्ये प्रत्येकी १०० अशा एकूण ६५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश इत्यादी सुविधा शासनाकडून मोफत पुरविण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी धनगर समाजातील असावा.

विद्यार्थ्यांच्या पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या धनगर समाजाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी, विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख रुपये इतकी असावे. सन २०२३-२४ या वर्षात विद्यार्थी पहिली ते पाचवी या इयत्तेत प्रवेशित असावा, असे सहायक आयुक्त श्रीमती गुठ्ठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Share now