शिक्षण-आरक्षण-संरक्षण धरणे आंदोलनास उपस्थित रहा. नुमान चाऊस
माजलगाव प्रतिनिधी.मुस्लिम समाज बीड जिल्हा भरात शिक्षण-आरक्षण-संरक्षणासाठी धरणे देणार.सविस्तर वृत्त असे की,२०१४ साली उच्च न्यायालयाने मान्य केलेले मुस्लिम आरक्षण मुस्लिमांना देण्यात यावे,
मुस्लिम समाजासाठी बार्टी, सारथी सारखे अभ्यासकेंद्र स्थापन करण्यात यावे, बंद करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यात याव्या, जागोजागी करण्यात आलेल्या मॉबलिंचिंग पासून संरक्षणासाठी मुस्लिम संरक्षण कायदा करण्यात यावा यासह अनेक मागण्यांसाठी उद्या दि.
२०/१०/२०२३ रोजी जिल्हाभरात मुस्लिम समाज तालुकास्तरावर धरणे आंदोलन करणार. याचाच भाग म्हणून माजलगाव, बीड, परळी, आंबेजोगाई, कैज, धारूर, वडवणी, गेवराई, शिरूर कासार, आष्टी पाटोदा या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी, पुढार्यांनी राजकीय जोडे बाजूला सारून, “तू छोटा” का
मी मोठा” म्हणून मिरवण्यापेक्षा समाजाच्या न्याय हक्कासाठी गट-तट विसरून मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक संरक्षणासाठी या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे नुमान अली चाऊस यांनी केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या वतीने सरकारला अल्टिमेटम देणार की १नोव्हेंबर पर्यंत मुस्लिम आरक्षण-संरक्षण दिले नाही तर नोव्हेंबर महिन्यात मुंबईच्या आझाद मैदानवर बेमुदत उपोषण करण्यात येइल.