ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

बदनापूर नगरपंचायतवर भाजपा ची सत्ता दोन ते तीन महिन्यांपासून नळाला पिण्याच्या पाण्याचा नाही पत्ता.

शहरातील पाणीटंचाई है तर सत्ताधाऱ्यांचे अपयश


शेख अजहर बदनापूरकर ( प्रतिनिधी ) नगरपंचायत वर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे.परंतु शहरवासियांची तहान भागेना शहरातील अनेक वार्डात गेल्या दोन ते तिन महिन्या पासुन नळाला पाणी आले नाही. नगरपंचायत चे गलथान कारभार मुख्याधिकारी व पाणीपुरवठा सभापती या वार्डात पानी सोडत नाही . दैविक असंच एक उदाहरण

वार्ड क्र .११ मध्ये दिनांक २० मार्च व २१ एप्रिल या रोजी नळाला पाणी आलतेयं तेव्हापासून ते आज पर्यंत नळाला पाणी आले नाही हे बदनापूर नगरपंचायतीच्या भाजप सत्ताधाऱ्यांना मुस्लिम वार्डाची ऍलर्जी आहे का ? असे दिसुन येत आहे बदनापूर शहरातील काही भागांमध्ये चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो पण वार्ड क्रमांक ११ है

अल्पसंख्यांक वार्ड असल्याने येथे नळाला पाण्याचा पत्ता नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकर धारकांकडून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे मुबलक पाणीसाठा पाणी पुरवठा नियोजनाअभावी शहरातील नागरिकांना पाण्यासाठी २०० ते ४०० रुपये मोजण्याची वेळ आली आहे . नगरपंचायतीने किमान आठ दिवसाला तरी पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे .

“मुख्याधिकारी पाटील साहेब यांनी लक्ष देण्याची गरज आहे. व पाणी पुरवठा सभापती हे वार्ड क्रमांक ११ मधये नगरसेवक हे राष्ट्रवादी चा असल्याने जानुन बुजुन पाणी पुरवठा होत नाही का ? अशा प्रश्न निर्माण होत आहे

Share now