ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

भालगाव येथे सुरू असलेले अन्न त्या उपोषण मागे.

अन्न त्या उपोषण मागे.

अंबड प्रतिनिधी :- मौजे भालगाव ता अंबड येथे मा. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संतोष मूळे व सुनील घाटूळ यांनी १२ सप्टेंबर रोजी सुरू केलेले अन्नत्याग आमरण उपोषण तहसीलदार चंद्रकांत शेळके साहेब यांच्या पुढाकाराने व पत्रकार सिद्धेश्वर उबाळे यांच्या मध्यस्थीने आज दि.१४ सप्टेंबर गुरुवारी दुपारी १२:३० वाजता नायब तहसीलदार धर्माधिकारी मंडळ अधिकारी कोठूले यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन सोडवण्यात आले.


अंतरवाली सराटी येथे मनोज पाटील जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या १७ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले होते मनोज पाटील जरांगे यांना यांच्या समर्थनार्थ मौजे भालगाव तालुका अंबड येथे संतोष पाटील मुळे व शिवाजी पाटील घाटूळ यांनी दिनांक १२ सप्टेंबर रोजी अन्नत्याग उपोषण सुरू केले होते आज दि.१४ सप्टेंबर रोजी मनोज पाटील जरांगे यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते उपोषण मागे घेतल्याने भालगाव येथील सुरू असलेले अमरण उपोषण अंबड चे तहसीलदार चंद्रकांत शेळके साहेब यांच्या पुढाकाराने व पत्रकार सिद्धेश्वर उबाळे यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. मात्र साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषण कर्ते संतोष मुळे यांनी सांगितले


यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर मुळे तलाठी ज्ञानेश्वर चौरे मा. सरपंच श्याम मूळे, उद्धव चौरे,सरपंच दत्ता जाधव चेअरमन आणसाहेब डवले, तंटामुक्ती अध्यक्ष आण्णासाहेब मूळे हरिभाऊ साबळे, राजाराम खंडागळे, कैलास मुळे,संभाजी सागडे, पोलिस पाटील,गजानन मुळे , रंगनाथ मुळे,संजय मुळे,गणेश मुळे ज्ञानेश्वर मुळे पवन मुळे अर्जुन मुळे दत्ता मुळे बालासाहेब मुळे विष्णू सुलताने ग्रामपंचायत सदस्य देवकर्ण मुळे,यांच्या उपस्थित आज तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले.

Share now