क्राईमताज्या घडामोडी

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल; महसूल पथकाची कारवाई.

त्या चौघांवर गुन्हा दाखल; महसूल पथकाची कारवाई.

अंबड प्रतिनिधी :- अंबड तालुक्यातील बळेगाव येथील गोदावरी नदी पात्रातून दह्याळाकडे अवैध वाळू वाहतूक करणा-या दोन ट्रॅक्टरच्या चालक मालक अशा चार जणांवर वाळू चोरी प्रकरणी गुरुवारी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई महसूल पथकाने केली असून


तहसीलदार श्री.चंद्रकांत शेळके यांचे आदेश मिळताच अंबड तहसीलचे महसूल पथक पैठण फाटा ते बळेगाव गस्तीवर असताना प्रविण लक्ष्मण पवार, महसूल सहाय्यक बी.एल.सानप तलाठी सजा आपेगाव,सतीष राक्षे बनगाव सजा, कोतवाल बळेगाव जवळील १२ नंबर चारीने दाळाकडे जाणाऱ्या रस्त्याने बिना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर बाळू वाहतूक करत असताना दिसले


दरम्यान महसूल पथकाने पाठलाग केला. मात्र दोन्ही ट्रॅक्टर
भरधाव वेगाने पळून गेले. सदर ट्रॅक्टर कोणाचे होते याची माहिती घेऊन मंडळअधिकारी संजय रामकृष्ण मिसे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही संशयित ट्रॅक्टरचालक मालक घनश्याम काकाजी नरवडे, रखमाजी शिवाजी नरवडे, नितीन राजेभाऊ नरवडे, अशोक ज्ञानदेव नरवडे यांच्यावर गौण खनिज कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share now