ताज्या घडामोडीमनोरंजन

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त.सीसीटीव्ही कॅमेरा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळपूर या ठिकाणी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.अजय अशोक मुंडे यांच्यातर्फे जि. प. प्रा. शाळा गोपाळपूर शाळेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उदघाटक धारूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य,

गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री शिवाजीराव अंडील साहेब, भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सादेक भाई इनामदार दिव्य मराठीचे पत्रकार संदिपान तोंडे साहेब पुण्यनगरी चे पत्रकार परमेश्वर राऊत, केंद्रप्रमुख गडदे साहेब, मुळे साहेब, गांधले साहेब ,माजी सरपंच चंद्रभान मुंडे, माजी सरपंच रामराव राठोड, दैवान मुंडे, जि. प. प्रा. शा. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वामन आडे गोपाळपूर शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक मुंडे सर ,नामदेव लांब सर, श्रीमती करपे मॅडम, तारशे मॅडम, साठे मॅडम, गोपाळपूर येथील शिक्षण प्रेमी ,पालक माता, ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती.


उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नेहमीच्या उपक्रमांतर्गत अनिरुद्ध मुंडे या विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक मुंडे सर , सूत्रसंचालन श्रीमती करपे मॅडम , आभार प्रदर्शन तारशे मॅडम यांनी केले.

Share now