ताज्या घडामोडी

छत्रपती संभाजी राजे यांनी घेतली आंदोलकांची भेट

अखंड तालुक्यात १ सप्टेंबर रोजी आंदोलनाला लागलेले गालबोट पोलिसांनी केलेला लाठीचार्ज गोळीबाराच्या पार्श्वभूमी छत्रपती संभाजी राजे तसेच खासदार बंडू जाधव यांनी अंतरवाली येथील ग्रामस्थ व आंदोलकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.बोलताना ते म्हणाले की, आंदोलकांवर अन्याय झाला आहे. शिवराय व शाहू महाराजांचा वंशज म्हणून मी येथे आलो आहे.

गोळी घालायची असेल तर माझ्यावर घाला. गोळीबाराचा आदेश देणाऱ्याचे निलंबन करा. मुघलांचं, निजामाचं राज्य आहे का? असा सवाल करीत त्यांनी ५८ मोर्चे मराठा समाजाने काढले. त्यातून जगासह देश व महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण केला. आतापर्यंत कोणत्याही आंदोलनाला गालबोट लागले नाही, मराठा समाज संयमी आहे. काल जो प्रकार घडला तो निंदनीय आहे.

Share now