ताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

तालुक्यात तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचवण्यासाठी कटीबद्ध : तालुका प्रमुख उदयदादा बोराडे

शिवसेना पोहोचवण्यासाठी कटीबद्ध : तालुका प्रमुख उदयदादा बोराडे

मंठा प्रतिनिधी :- शिवसेना पक्षाच्या जालना जिल्हा निरीक्षकपदी ठाणे शहराचे माजी महापौर राजेंद्र शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथमच जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांचा दौरा केला. परतूर-मंठा विधानसभेचा आढावा घेण्यासाठी ते दिनांक ५ ऑगस्ट रोजी मंठा शहरात प्रल्हादराव बोराडे कॉम्प्लेक्स येथे आले होते. शिवसेना तालुकाप्रमुख उदयदादा बोराडे व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांतर्फे मा. शिंदे साहेबांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. संपुर्ण मंठा तालुक्यातील व

शहरातील शाखा प्रमुख,बुथ प्रमुख, सर्कल प्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी यांना या आढावा बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. उदयदादा बोराडे यांच्यासारख्या सामान्य घरातील एका युवानेतृत्वाच्या कामाची दखल मा.मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा घेतली अश्याप्रकारे मा. राजेंद्र शिंदे यांनी उदयदादांचे कौतुक केले. येणाऱ्या काळात दादांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शिवसेना पक्षाचे काम अधिक जोमाने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय सुध्दा त्यांनी करुन घेतला. मंठा तालुक्यातील विकास कामांसाठी अधिकाधिक निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहिल असा शब्द त्यांनी याप्रसंगी सर्व

कार्यकर्त्यांना दिला.उदयदादांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे ,मोहन अग्रवाल तसेच जिल्हा संपर्कप्रमुख पंडीत भुतेकर यांनी आपल्या भाषणात उदयदादांच्या संघटन कौशल्याचे व पक्ष वाढवण्यासंबंधीच्या कार्याचे विशेष कौतुक केले.तालुक्यातील तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचवण्यासाठी व मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे काम पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचा शब्द उदयदादा बोराडे यांनी मा.शिंदे यांना यानिमित्ताने दिला व शिवसेना पक्षाच्या जालना जिल्हा निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी शिवसेना नेते तथा कृ.उ.बा.समिती संचालक प्रल्हादराव बोराडे,शिवसेना उप तालुकाप्रमुख गजानन कापसे,

युवासेना तालुका प्रमुख ऍड.राजेश खरात, दलीत आघाडी प्रमूख दिलीपराव हिवाळे, ओबीसी सेल प्रमुख चांद भाई पठाण,युवासेना शहरप्रमुख दीपक गायकवाड,विजय चव्हाण,विलास राठोड,गजानन अवचार ,लिंबाजी बोराडे, कैलास बनकर,अर्जुन चव्हाण, नितीन राठोड, संदीप चव्हाण शुभम गुंड ,समाधान शेवाळे, पवन खरात ,तुकाराम तांगडे, सिद्धू जाधव ,संदेश चव्हाळ ,बंडु बोराडे ,महादेव जावळे, जिगर भाऊ अवचार,अविनाश चव्हाण ,रामराव वरकड ,शेख रहीम, राहुल बोने अंगद मोरे, महेश वायाळ ,विशाल वरकड ,ज्ञानेश्वर बोने ,कृष्णा घोडे,व इतरही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share now