भोकरदन येथे बांधकाम मजुराचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू
बांधकामगारांचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू
भोकरदन : भोकरदन शहरातील अमर हॉस्पिटल च्या मागे रफिक काॅलनी परिसरात बांधकाम सुरु असलेल्या चार मजली इमारतीवरून पडून एका २७ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक ६ गुरूवार रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
नारायण पुंडलिक गायकवाड २७ वर्ष रा.मुठाड तालुका भोकरदन जिल्हा जालना असे मयत झालेल्या मंजुराचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, जालना रोडवरील अमर हॉस्पिटल डॉक्टर राजपूत यांच्या नवीन चार मजली
इमारतीचे बांधकाम सुरु असून.या ठिकाणी नारायण गायकवाड काम करत हाेता.चौथ्या मजल्यावर काम करत असताना त्याचा ताेल जाऊन ताे खाली पडला.यात मजूराचा जागीच मृत्यू झाला.इमारतीवरील
उपस्थित मजुर व मिस्त्रींनी त्याला तातडीने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र
येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घाेषित केले.त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान नारायणच्या पार्थिव देहावर शुक्रवारी दुपारी तीन वाजेला मुठाड येथील स्मशान भूमीमध्ये शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले आहे.
त्याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी व पत्नी दोन लहान मुले असा परिवार आहे.नारायण हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता व त्याच्यावर अचानक काळाने घाला घातल्याने त्याचा एक दीड वर्षाचा मुलगा आणि एक लहान सहा महिन्याचा बाळ ही पोरके झाले आहेत.त्याच्या या निधनामुळे संपूर्ण गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
या प्रकरणी भोकरदन पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.