प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत पाककृती स्पर्धा गुंज येथे संपन्न
पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत पाककृती स्पर्धा गुंज येथे संपन्न
पाथरी प्रतिनिधी. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककृती मेनू स्पर्धा गुंज येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये गुंज खुर्द केंद्रांतर्गत सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता. सर्व शाळेतील कार्यरत स्वयंपाकी व मदतनीस या सर्वांनी वेगवेगळे मेनू तयार करून आणले होते. पाच निकषाच्या आधारे पाच परीक्षकांनी परीक्षण करून विजेत्यांची निवड निवड करण्यात आली.
प्रत्येक मुद्द्याला दहा गुण होते, एकूण 50 गुण पैकी ही स्पर्धा होती यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपुरी खुर्द शाळेचा केंद्रांतर्गत पहिला क्रमांक आला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंधापुरी या शाळेचा केंद्रांतर्गत दुसरा क्रमांक आला असून त्यांना तालुका स्थरीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली आहे.या वेळी मेनू स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्वांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पाथरी श्री मुकेश जी राठोड सर व श्री चोरमारे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवल्या बद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपुरी खुर्द येथील स्वयंपाकी व मदतनीस पारुबाई फुके, आफ्रिन शेख, शारदा शेवाळे यांचे श्रीमती मुक्ते मॅडम यांनी शाळेच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यपक श्री. घाटुळ सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.