ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न.

पाथरी प्रतिनिधी.शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न.आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये माहिती व प्रशिक्षण असणे अत्यंत आवश्यक- इन्स्पेक्टर ईश्वर मतेपाथरी वार्ताहर:सर्वसामान्य नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी स्वतः घेणे आवश्यक आहे, प्रशासन पातळीवरती मदत ही उशिरा मिळू शकते त्यामुळे नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घ्यावेत,

आपत्ती व्यवस्थापना विषयी माहिती व प्रशिक्षण असणे अत्यंत आवश्यक आहे असे मत एनडीआरएफ बटालियन पुणे येथील इन्स्पेक्टर ईश्वर मते यांनी व्यक्त केले.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी यांच्या वतीने वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता.पाथरी जि. परभणी येथे दिनांक २ डिसेंबर 2023 शनिवार रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरीचे सभापती तथा वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी चे अध्यक्ष

अनिलभाऊ नखाते हे होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी चे उपसभापती श्यामभाऊ धर्मे, संचालक आनंद धनले, ज्येष्ठ गटशिक्षण विस्तार अधिकारी, मुकेश राठोड, प्राचार्य डहाळे के .एन मुख्याध्यापक यादव एन.ई., तर प्रशिक्षक म्हणून एन डी आर एफ फिफ्थ बटालियन पुणे चे प्रमुख इन्स्पेक्टर ईश्वर मते, हवालदार नरेंद्र यादव, कॉन्स्टेबल अनिल पाटील ,उत्तम लोकरे, मच्छिंद्र माने, बाळकृष्ण वायदंडे ,किल्लेदार संग्राम, विजेंद्र घाडगे आदी उपस्थित होते.गर्जा महाराष्ट्र माझा या राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश राठोड यांनी

केले.एनडीआरएफ फिफ्थ बटालियनचे प्रमुख ईश्वर मते व त्यांच्या टीमने पाथरी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले. रक्तस्त्रावास प्रतिबंध करणे, गॅस सिलेंडर ला अचानक आग लागल्यानंतर ती विजवणे , रुग्णास तात्काळ मदत देण्यासाठी स्ट्रेचरची व्यवस्था करणे, हृदय बंद पडल्यास सीपीआर करणे, इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली उतरणे, आपत्कालीन

परिस्थितीमध्ये स्वतःला व इतरांना वाचवणे अशा महत्त्वपूर्ण बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.आपत्कालीन परिस्थितीची जागरूकता आणि उपकरणे यांची अत्यंत आवश्यकता आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य किशन डहाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक बालासाहेब गायकवाड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share now