माजी नगर अध्यक्ष सहालभैय्या चाऊस मित्र मंडळा कडून गणेश भक्तांना पिण्याचे पाणी वाटप.
सहालभैय्या चाऊस मित्र मंडळा कडून गणेश भक्तांना पिण्याचे पाणी वाटप.
माजलगांव प्रतिनिधी फेरोज इनामदार माजलगाव शहरातील सहालभैया चाऊस मित्रमंडळा कडून दि.२८ रोजी काढण्यात आलेल्या गणेश मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश भक्तांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आल्या.यावेळी उपस्थित नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत होते.
माजलगांव शहरात सर्व महापुरुषांच्या जयंत्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात.या उत्साहात सर्वधर्मीय नागरिक सहभागी होतात.माजलगाव शहरात नेहमीच दिसून येणारं भाईचाऱ्याचं हे चित्र आहे.दरम्यान या जयंती उत्साहात गणेश महोत्सवात त्या त्या महापुरुषांचे अनुयायी,देवी देवतांचे भक्त सहभागी होतात.अशा सर्व मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी नेहमीच सहालभैय्या चाऊस मित्र मंडळाकडून पिण्याच्या पाणीच्या बॉटलचे वाटप
करण्यात येते.गुरुवार दि.२८ रोजी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीतही सहभागी झालेल्या गणेश भक्तांना पाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पाणी बॉटल वाटप करताना युवा नेते बिलालदादा चाऊस,समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मुज्जमिल पटेल,पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेशकाका मोगरेकर,प्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर,पत्रकार राज गायकवाड हे उपस्थित होते.