ताज्या घडामोडीमनोरंजन

जिल्हा परिषद शाळेत ईद ए मिलाद् कार्यक्रम संपन्न

माजलगाव शहरातील जिल्हा परिषद शाळेत ईद ए मिलाद् कार्यक्रम संपन्न

माजलगाव प्रतिनिधी जिल्हा परिषद माजलगाव नंबर एक शाळेत मुख्याध्यापिका सिद्दिकी कौसर अमजद बाजी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक अत्तार अब्दुल रहीम सर यांच्या अध्यक्षतेखाली ईद-ए-मिलाद निमित्त सिरत पैगंबर यांच्या विषयी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आवर्जून आमीना शाळेचे मुख्याध्यापक सिद्दिकी जफर सर, बुखारी शाळेचे शेख इरफान सर, शेख माजेद सर., वडार नगर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक खतीब अजीम सर हे उपस्थित होते, खतीब सर यांनी उत्कृष्ट नात शारीफ पठण केली. सर्व प्रमुखांच्या हस्ते बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विखार इनामदार सर यांनी केले तर सूत्रसंचालन खाजा खान सर यांनी केले आभार प्रदर्शन अबूबकर सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोमीन साजेदा बाजी व सिद्दिकी खालेदाबाजी याने प्रयत्न केले

Share now