महाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

मनसे विद्यार्थी सेनाच्या अंबड शहराध्यक्षपदी महेश चोथे यांची निवड

अंबड शहराध्यक्षपदी महेश चोथे यांची निवड

Election of Mahesh Chothe as Ambad City President of MNS Vidyarthi Sena

अंबड,प्रतिनिधी :- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाच्या अंबड शहराध्यक्षपदी महेश चोथे यांची निवड छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात करण्यात आली. ही निवड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिलेल्या नियुक्तीपत्राद्वारे केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम खटके यांची उपस्थिती होती.दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हंटलेआहे

की,विद्यार्थी,पालक,शिक्षक तसेच शैक्षणिक संस्था यांना भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांना समोरे जाऊन ते प्रश्न सोडवावीत. तसेच येणाऱ्या पिढीसमोरील विविध शैक्षणिक आव्हानांचा,समस्यांचा अभ्यास करावा. तसेच काही प्रसंगी आंदोलन करून ती

प्रश्न सोडविण्यासाठी सज्ज राहावे. तसेच महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणी प्रभावी विद्यार्थी संघटना म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी माझ्यासोबत संघटनेचे काम करण्याचे आवाहन नियुक्ती पत्रात केले आहे. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Share now