ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

शेख खुर्शीद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परभणी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परभणी जिल्हा उपाध्यक्षपद्दाची निवड

पाथरी प्रतिनिधी.आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिले निवडीचे पत्र सामाजिक राजकीय क्षेत्रात जाणीव असलेले एक अभ्यासू परिपक्व व्यक्तीमत्व शेख मो. खुर्शीद भाई यांची विधान परिषदेचे आमदार तथा परभणी जिल्हा अध्यक्ष आ.बाबाजाणी दुर्राणी साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केली असल्याने शेख खुर्शीद भाई यांचे सर्व स्तरातून अभीनंदन होत आहे.विशेष म्हणंजे शेख खुर्शीद भाई हे

आ.बाबाजाणी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री अजितदादा पवार यांचे विचार व ध्येयधोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करीत आहेत. अशा कार्यकर्त्यांच्या पाठीराखे माननीय जुनेद भैया दुर्राणी, मा. तबरेज दादा दुर्राणी तसेच तारेख भैया दुर्राणी हे खंबीरपणे उभे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते पाथरी शहरासह तालुक्यात ऊतम कार्य करत

असल्याने त्यांची वर्णी लागणे योग्यच होते.यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदांची धुरा व्यवस्थीत सांभाळून पक्षाला पुढे नेण्याचे काम निश्चित करतील असा अशावाद असल्याने पक्षाने जिल्हा उपाध्यक्षपदा ची धुरा त्यांच्यावर सोपवलेली दिसते.‌त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे अनेक कार्यकर्त्यांकडून अभीनंदन करण्यात येत आहे.

Share now