ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

माजी नगरसेवक संजय बजाज यांचे निधन

माजलगाव प्रतिनिधी. माजलगाव येथील माजलगाव नगर परिषदचे माजी नगरसेवक संजय रामनिवासजी बजाज वय ५५ वर्ष यांचे अल्पशा आजाराने दिनांक २९ जुलै २०२३ शनिवार रोजी रात्री साडेनऊ वाजता सुमारास निधन झाले आहे त्यांच्या पार्थिवावर दिनांक ३० जुलै २०२३ रविवार रोजी दुपारी १२.३० वाजता राजस्थानी वैकुंठभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.शहरातील प्रसिद्ध डॉक्टर आर. जी. बजाज यांचे ते पुतणे होते.

माजी नगरसेवक प्रतिष्ठित शेतकरी उद्योजक संजय रामनिवासजी बजाज वय 55 वर्ष हे अत्यंत शांत संयमी मनमिळावू स्वभावाचे होते त्यांचे अचानक अल्पशा आजाराने मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रकृतीने साथ न दिल्याने दिनांक 29 जुलै शनिवार रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दि.३० जुलै २०२३ रविवार रोजी दुपारी १२.३० वाजता माजलगाव येथील राजस्थानी वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात आई, पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,एक भाऊ,तीन बहिणी असा मोठा परिवार आहे.

Share now