क्राईमताज्या घडामोडी

अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा हायवा वाळू विरोधी पथकांनी पकडला.

अंबड प्रतिनिधी :- दिनांक .४ जुलै रोजी माळ्याची वाडी येथे पाचोड टोल नाक्याजवळ तलाठी श्री विनोद ठाकरे, रामकिशन महाले, महसूल सहाय्यक श्री प्रवीण पवार यांना गस्तीवर असताना मिनी हायवा क्रमांक एम एच-२१ बि.एन.९४०४ मध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना

दिसून आला.गाडी थांबवून ड्रायव्हरला विचारणा केली की वाळू वाहतूकी संदर्भात त्यांच्याकडे वाहतूक पास आहे का,तर त्याने नकारार्थी उत्तर दिले.गाडीची झाडा झडती घेतली असता अंदाजे तीन ब्रास वाळू आढळून आली.सदरची वाळू त्याने पैठण तालुक्यातील मौजे हिरडपुरी

येथून भरुन औरंगाबाद कडे घेऊन जात असल्याचे सांगितले.त्याच्याकडे वैध परवाना नसल्याने वाहन पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय अंबड येथे लावण्यात आले आहे. तसेच सदर वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.अशी माहिती दिली.

Share now