क्राईमताज्या घडामोडी

रेल्वे मध्ये गोळीबार करून चार निष्पाप लोकांची हत्त्या करणाऱ्या चेतन सिंहाला फाशी द्या

भोकरदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना निवेदन

भोकरदन प्रतिनिधी : जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानाने गोळ्या झाडून चार निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या चेतन सिंहाला फाशी देण्यात यावी तसेच हरियाणामध्ये बजरंग दलच्या लोकांनी व त्यांच्यासह काही समाज कंटकांनी धार्मिक स्थळावर हल्ला करून तेथील


मौलाना हाफीज साद यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांची हत्या केली असून त्यांच्या मारेकऱ्यांना पण फाशी देण्यात यावी.अशी मागणी भोकरदन येथील समस्त मुस्लिम समाज व महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांना देण्यात आले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की,मंगळवारी (31 जुलै) सकाळी जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस रेल्वे मध्ये

संरक्षण दलाच्या (RPF) जवानांनी गोळीबार केल्याने मुंबई हादरली आहे.जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गुजरातच्या वापी स्टेशनजवळ महाराष्ट्र सीमेजवळ असताना एका आरपीएफ जवानाने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकासह चार निष्पाप लोकांची गोळ्या झाडून हत्या केली.हा हत्यारा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांमध्ये फिरला आणि एकूण 12 गोळ्या झाडल्या असून.त्यानंतर मीरा रोड स्थानकावर पोहोचण्यापूर्वी ट्रेन थांबवून त्याने ट्रेनची चेन खेचली आणि बाहेर उडी मारली.आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना तिथे तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून.तसेच


चार लोकांना ठार मारल्यानंतर चेतन सिंहा हा ट्रेनमध्ये इतर लोकांना सुध्दा धमकावत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे.चार निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या चैतन सिंहा व हरियाणा येथील मौलानाची हत्त्या करणाऱ्यांना फाशी देण्यात यावी.अशी मागणी समस्त मुस्लिम समाज भोकरदन व

महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना निवेदाद्वारे करण्यात आली.यावेळी माजी.उपनगराध्यक्ष शेख रिझवान,माजी.नगरसेवक कदिर बापू,एजाज पठान,मुजीब हाजी,शमीम मिर्झा,मुमताज़ मदनी,सलीम शेख,फहीम कादरी,साबेर शाह,न्याज़ मोहम्मद,अजहर पठान,नासेर शाह,शब्बीर मास्टर,नुझेर शाह,शेख रफीक,गुड्डू कादरी,नईम हाजी,झहीर शेख,अमान खान,सिराज पठान आदि सह उपस्थित होते.

Share now