ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

भोकरदन शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस

Heavy rain in Bhokardan town and taluk

भोकरदन : शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस शहर झाले जलमय,पहिल्याच पावसात घरात घुसले पाणी भोकरदन शहरासह तालुक्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली.या पावसामुळे शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला.पण,शहरात विचित्र परिस्थिती पाहावयास मिळाली.

शहरातील नुरानी परिसरात काही नागरिकांच्या घरात व रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते.पावसाळा सुरू होऊन महिना लोटल्यानंतर वरून राजाने हजेरी लावली नव्हती.रविवारी (दि.२) दिवसभर ऊन आणि रिमझिम पाऊसाचा खेळ सुरू होता.परुंतु सायंकाळी पाच वाजे नंतर एकच तास जोरदार पाऊस बरसला.

यामुळे शहर जलमय झाले होते.तालुक्यात चांगलाच पाऊस पडला.या पावसानं काहींची गैरसोय झाली.पण, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे.तर नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वीच्या कामाकडे दुर्लक्ष केले.पडलेल्या पावसामुळे नाल्याचे पाणी थेट घरात घुसले.घरातील साहित्य ओले झालेत. नगरपरिषदेच्या या ढिसाळ कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसला

पहिल्याच पावसात नाल्याचे पाणी घरात घुसले.नाल्यांची साफसफाई न केल्याने असा प्रकार घडला.गाळ साचून तुडुंब भरल्याने पावसाचे पाणी तसेच गटाराचे पाणी हे रस्त्यावरून वाहिले.आरोग्याचा धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.एव्हढेच काय या पावसाने नाले, ओढेसुद्धा तुडुंब वाहू लागले होते.-

पाण्याला उग्र वास*काही पाणी नागरिकांच्या घरात घुसले. यामुळे गटारीमधील घाण आणि त्याचा उग्र वास नागिरकाना सहन करावा लागला.पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत घरी जावे लागले.नागरिकांच्या घरात घाण पाणी घुसले होते.शहरातील सामाजिक कार्यकर्ते शमीम भाई मिर्झा व

माजी. नगरसेवक अब्दुल कदिर यांनी घरात नाल्याचे पाणी घुसलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तर सामाजिक कार्यकर्ते शमीम भाई मिर्झा यांनी मदत केली.फोटो ओळी : भोकरदन शहरातील नुरानी परिसरात एका घरात नाल्याचे पाणी घुसले तर दुसऱ्या छायाचित्रात बरंजळा साबळे येथे शेतात पावसाचे पाणी साचले होते.*छाया सलिम शेख*

Share now