क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

अंबड तालुक्यातील वाळू घाटाचे बेकायदेशीर उत्खनन थांबुन गोरगरिबांना कमी दरात घरपोच वाळू न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा..

वाळू घाटाचे बेकायदेशीर उत्खनन थांबुन गोरगरिबांना कमी दरात घरपोच वाळू न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा

जालना प्रतिनिधी :- तालुक्यातील शहापूर दाढेगाव हसनापूर पिठोरी सिरसगाव व आपेगाव या वाळू घाटातून कोणतेही डिमांड नसतांना वाळू उत्खननाचे काम सुरू आहे. सदरील घाटांचा लिलाव करताना पर्यावरण विभागाची अनुमती,

ग्रामसभेच्या ग्राम दक्षता समितीची शिफारस तसेच वाळू सनियंत्रण समिती यांची कोणतीही सहमती न घेता सदरील वाळू घाटांचा लिलाव महसूल प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दरम्यान अंबड तहसील कार्यालयातुन गौण खनिज विभागाचे अव्वल कारकून घोरपडे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सविस्तर माहिती मागितली

असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा हवाला देत शासनाच्या नियमाप्रमाणे वाळू उत्खनन दराबाबत निविदा धारकांना वाढीव दर देण्यात आले आहे असे सांगण्यात आले आहे.दरम्यान वाळू उत्खनन करत असताना अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव, हसनापूर , शहापूर,दाढेगाव व आपेगाव या वाळू घाटावर शासनाच्या दिनांक. २८ जानेवारी २०२२ च्या सुधारित १९ एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयाप्रमाणे वाळू उत्खननासाठी सर्वसाधारण निर्बंध , अटी व शर्तीचे पालन करण्यात आले नसून त्यात जीआरएस वाळू उत्खनन करताना सकाळी ६.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंतच्या कोणत्याही नियमाचे पालन न करता

रात्रंदिवस उत्खनन करून वाळूचा उपसा केला जात असून सदरील वाळू घाटात २४/७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असताना सुद्धा नाम मात्र थातूरमातूर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे दाखविण्यात आले असून सदरील उत्खनन करताना मोठ्या प्रमाणात वाळू चोरी झाल्याचे समजते तसेच जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने सदरील नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे तयार झाल्याने पर्यावरणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे

याशिवाय संबंधित शासनाच्या वाळू डेपोवर जी वाहने लावण्यात आलेली आहेत त्यांचेही भाडे गोरगरिबांना परवडणारे नाहीत आणि सद्यस्थितीत गोरगरिबांना ६०० रुपये ब्रास प्रमाणे देण्यात येणाऱ्या वाळू डेपो मध्ये महा-ई-सेवा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीतीच्या प्रक्रियेमध्ये आपेगाव येथील गंगाच्या वाळू घाटाची कोणती ऑनलाइन प्रक्रिया सुरू नाही.वरील सर्व बाबींचा विचार करता शासनाच्या कोणत्याही नियमाचे पालन महसूल प्रशासनाकडून होत नसल्याने तसेच रमाई आवास घरकुल योजना, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना या गोरगरिबांना शासनाच्या नियमाप्रमाणे वाजवी व स्वस्त दरात वाळू मिळाली नाही तर

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अंबड तहसील कार्यालयासमोर जन आंदोलन करू ? असा इशारा एका निवेदनाद्वारे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आला आहे सदर निवेदनावर ज्येष्ठ नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत दीलपाक,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कारके,युवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अर्जुन भोजने,

जिल्हा कार्याध्यक्ष गौतम ढवळे,सुरज गुढे,शेख समीर,गालेब बाशन , आनंद जाधव,शेख समीर , अभिजीत शिरगुळे,दीपक बिडे , दानवेल घुले,रमेश सोनवणे , आनंद जाधव,दीपक पिसुळे , अभिजीत शिरगोळे,यव्हाण आहेर,दानवेल घुले,राजु घुले, यांच्यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share now