इम्रान नाईक यांना रोटरी क्लब तर्फे देण्यात आली सर्वांत मोठी जबाबदारी
माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार आज माजलगाव येथे जहिर सर यांच्या निवासस्थानी इम्रान नाईक यांना रोटरी क्लब तर्फे देण्यात आलेले सर्वात मोठी जबाबदारी अध्यक्षपद हा मुस्लिम समाजासाठी कौतुकस्पद बाब आहे हया निमित्ताने सत्कार छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला तसेच शेख इरफान सर यांना
उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला व मुस्लिम समाजातील विविध प्रश्न संदर्भात सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी चर्चेद्वारे सामूहिकरीत्या समाजाच्या कामासाठी अहोरात्र परिश्रम घेण्याचा निश्चय केला व लवकरच तालुकास्तरावरील
समिती गठीत करून उलेमा यांच्या निदर्शनाखाली एक समिती स्थापन करून शिक्षणासाठी व इतर समाजातील ज्वलंत प्रश्नसंदर्भात काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे व सर्वात उत्कृष्ट काम केल्याबद्दल नित्रुड चे ग्रामपंचायत सदस्य व ऑनलाईन काम करणारे शफिक भाई यांच्या समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.