Uncategorized

भोकरदन शहरामध्ये बिनधास्तपणे सट्टा, मटका जुगार,पत्त्याचे क्लब बेसिस्त पणे चालु व सर्व अवैध बंद करण्याची मागणी

पोलिस अधिक्षक यांना निवेदन

भोकरदन : भोकरदन शहरामध्ये नविन भोकरदन परिसरात विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालया समोर, डॉ.बाबासाहेब
आंबेडकर पुतळयाच्या बाजुला सट्टा, मटका विधास्तपणे चालु आहे. धनगरवाडी परिसर, नवीन भोकरदन येथे जुने बसस्टॅन्ड सह शहरात अनेक ठिकाणी व शहरापासून काही अंतरावर जुई धरण पाटी सह तालुक्यात अनेक ठिकाणी


सट्टा, मटका,पत्त्याचे क्लब बिंधास्तपणे चालु आहे व पोलिस प्रशासन त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कार्यवाही करत नाही.तसेच भोकरदन शहरामध्ये अवैध गुटखा कारोबार सुध्दा बिनधासपणे चालु आहे.शहरासह तालुक्यात अवैध धंदे वाल्यांनी धुमाकूळ घातलाय पोलिस
प्रशासाकडून त्यांना मोकळे राण सोडल्याचे दिसते.

यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तर काही जणांचे होण्याच्या मार्गावर आहे.याकडे भोकरदन पोलीस प्रशासन सोयीस्कर पणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.शहरासह तालुक्यातील या सट्टा,मटका व पत्त्याच्या क्लब चालकांवर व अवैध धंदे वाल्यांवर कोणत्याही प्रकारची मोठी कार्यवाही करण्यात आलेली नाही.थातुर मतुर कारवाई सह चिरीमिरी करून करण्यात येते.


तरी या सर्व अवैध धंदे वाल्यांवर पोलीस अधिक्षक कार्यालयामार्फत कठोर कार्यवाही करण्यात यावी व यानंतर भोकरदन शहरासह तालुक्यातील परिसरामध्ये सट्टा, मटका, पत्त्यांचे क्लब व गुटखा सह सर्व अवैध धंदे हे परत चालु होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
नसता लोकशाही पध्दतीने आपल्या कार्यालयासमोर समाज वादी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.व यात काही अप्रर्यकृत्य घडल्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील असे समाज वादी पार्टीच्या वतीने पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

Share now