ताज्या घडामोडीमनोरंजन

लोकवर्गणीतून संगणक कक्षाचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

रेनाखळीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत संगणक कक्षाचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन


पाथरी प्रतिनिधी.बोरगव्हाण येथील शाळेत स्वातंत्र्यवीर कोनशिलेचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राज्याचे गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पाथरी तालुक्यातील रेनाखळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेल्या संगणक कक्षाचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी मेरी माटी, मेरा देश अभियानांतर्गत शिलाफलकाचे उद्घाटन श्री. सावे यांच्या हस्ते झाले. तसेच बोरगव्हाण येथील जि.प.आंतरराष्ट्रीय प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्यवीर कोनशिलेचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अशोक गोरे, डॉ. सुभाष कदम, संतोष मुरकुटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसिलदार सौदागर तांदळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) गणेश शिंदे, गटविकास अधिकारी शिवराज केंद्रे, सरपंच राहुल ब्रह्मराक्षे यांच्यासह रेनाखळी आणि बोरगव्हाण येथील शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक यांची उपस्थिती होती.

Share now