विविध विकास कामाचा आमदार .दुर्राणी यांचे हस्ते शुभारंभ
सिमेंटरस्ता,नाली व एलईडी कामाचा आ.दुर्राणी यांचे हस्ते शुभारंभ.
पाथरी प्रतिनिधी.परभणी जिल्हातील पाथरी तालुक्यातील वडी येथे मंगळवारी २५-१५ अंतर्गत सिमेंटरस्ता,नाली बांधकाम व विद्युत पोलवरील एलईडी कामाचा शुभारंभ आमदार बाबाजानी बाबाजाणी दुर्राणी यांचे हस्ते करण्यात आला याप्रसंगी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते,उपसभापती शाम धर्मे,जिल्हा बँकेचे संचालक दत्तराव
मायंदळे,पं.सं.माजी सभापती राजेश ढगे,बंटी पाटील, सरपंच राजेभाऊ सोपानराव खंडागळे,उपसरपंच शिध्देश्वर शिंदे पाटील,भगवानराव वडीकर,प्रताप शिंदे,शिवराज शिंदे यांची उपस्थिती होती.
२५-१५ योजनेअंतर्गत वडी येथे ६०० फुट नाली बांधकाम व सिमेंट रस्ता आणि ३३ विद्युत पोलवर एलईडी अशी कामे ५० लाखाच्या निधीतून होणार आहेत.उद्घाटन प्रसंगी आ.बाबाजाणी दुर्राणी म्हणाले की, कामाचा गुणात्मक दर्जा चांगला असावा जेणे
करून ही सुविधा १० वर्ष कायम सातत्यपूर्ण असली पाहिजे. याशिवाय वडी गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.नाली बांधकामामुळे सांडपाण्यासह पाण्याची योग्य व्यवस्थापन होईल. रस्त्याची समस्या सुटेल आणि एलईडी मुळे गाव प्रकाशमय होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.