ताज्या घडामोडीमनोरंजन

जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळा नेर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

उर्दु प्राथमिक शाळा नेर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

जालना प्रतिनिधी :- तालुक्यातील मौजे नेर येथे जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी गावात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.ध्वजारोहण करण्यात आले.स्वातंत्र्य दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष हाजी सय्यद अहेमद होते.कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक अता मोहम्मद बख्शी सर व सुत्रसंचालन खान जेबा आणि आरमीन या मुलींनी केली.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष खान अमानुलला,हाजी खाजा खान, सय्यद कौसर, मिनाज खान पठाण, साजेद खान पठाण, माजी सरपंच कैलासराव सहाणे उपस्थित होते.

यावेळी माता पालक संघाच्या सर्व सदस्यांचा आणि स्वयंसेवकाचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी देश भक्ती ची गीते व भाषने केली.यावेळी शालेय समितीचे सर्व सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमास कैसर खान, समंदर खान,

रियाजोद्दीन तांबोळी, शेख पाशा, जावेद भाई, राजू प्लंबर, शेख सत्तार भाई, अबरार खान माता पालक संघाच्या उपाध्यक्ष श्रीमती खान हिना अमानुल्ला, शेख हसीना,समीना बेगम, शाहीन मॅडम, निलोफर मॅडम, मुख्याध्यापक अता मोहम्मद बख्शी सर, काजी सलाहोद्दीन सर, मसरतजहा मॅडम, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.सलाहोद्दीन सर यांनी आभार व्यक्त केले.

Share now