ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

मठ जळगाव येथे आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशन च्या वतीने गांडूळ खत निर्मितीची माहिती व बेडचे वाटप

आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशन च्या वतीने गांडूळ खत निर्मितीची माहिती व बेडचे वाटप.

अंबड प्रतिनिधी :- सोमवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठ जळगाव येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले कार्य समता, बंधुता याची शिकवण देणारे शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. आय.सी.आय.सी‌.आय फाऊंडेशन चे जिल्हा विकास अधिकारी श्री.शेषराव ससाणे, सरपंच श्री.अंकुश निकाळजे,

उपसरपंच श्री.बद्रीनाथ डोंखळे ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशन चे जिल्हा विकास अधिकारी श्री.शेषराव ससाणे यांनी शेतकऱ्यांना गांडूळखत निर्मिती विषयी माहिती शेतकऱ्यांना गांडूळखत निर्मिती त्याचे महत्त्व व फायदे याविषयावर मार्गदर्शन केले.

तसेच रासायनिक शेतीमुळे होणारे नुकसान आणि शेंद्रिय शेतीचे महत्व याविषयी माहिती दिली.आय.सी.आय.सी‌.आय फाऊंडेशन तर्फे गावामध्ये केली जाणारी विविध विकास कामे गांडूळ खताची बेड,कुकट पालन, मुरघास बॅग,केशर आंब्याची रोपे,बी.बी.एफ.मशीन,टोकण मशीन,बोर्डो पेस्ट तसेच बचत गटासाठी असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.त

सेच गांडूळ खत निर्मितीचे बेड वाटप केले.तालुका प्रतिनिधी श्री.किरण कोल्हे यांनी शेतकऱ्यांना बेड या संदर्भात माहिती देताना सांगितले की बेड कसा लावावा शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले ज्यामध्ये बेड कसा भरावा,बेडची काळजी कशी घ्यावी, गांडूळ कधी सोडावे, गांडूळ खाली कसे करावे आणि पैशाची बचत या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच शाळेतील टॉयलेट दुरुस्ती आणि वृक्षारोपण संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकांसोबत चर्चा करण्यात आली.यावेळी शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share now