मयतांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान ची मागणी
पुसेसावळी दंगलीचा सि.बी.आय मार्तफ पास करा
बदनापूर प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात घडलेल्या घटनेची सिबीआय कडुन निःपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि पुसेसावळी येथील ज्या लोकांचे घरे वाहने दुकाने जाळण्यात आली त्यांची भरपाई देण्यात यावी आणि ज्यांचा जीव या घटनेत गेला त्यांच्या कुटुंबीयांना २५ लाख . द्यावी , अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठाण , बदनापूर च्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व मा.गृहमंत्री यांच्या कडे २०
सप्टेंबर रोजी बदनापूर तहसिलदार मार्फत पाठवण्यात आले . दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की , १५ ऑगस्ट रोजी सोशल मीडिया पोस्ट वरुन दोन गटात तणाव निर्माण झाला होता , जिल्हा प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यानं दंगल झाली , तरीही १२ सप्टेंबर पर्यंत आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली नाही . सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या विरोधात कडक कारवाई करावी आणि निरपराध मुस्लिम व्यक्तींवर हल्ले करुन त्यांची घरे जाळली जात आहेत , मशिदी जाळल्या जाताहेत , यातुन दोन धर्मात तेढ निर्माण केला जात आहे . म्हणून महाराष्ट्रातील कायदाच सुव्यवस्था
बिघडविण्याचा कट रचला जात असुन या सर्व घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आले. वेळीस याची दखल घेवुन पिडीतांना न्याय मिळवून द्यावा नसता महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान तर्फे संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येईल व लोकशाही मार्गाने मुकमोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आले. अशी मागणी निवेदनात बदनापूर तहसीलदार. सुमन मोरे यांना देण्यात आले यांना निवेदन देतांना महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठाण चे
मराठवाडा अध्यक्ष. शेख अजहर बदनापूरकर, जिल्हा अध्यक्ष. हाफिज हारुन पठाण, मिर्झा सरफरोज, शेख अग्बर, माजी ग्रा.पं.स.शेख युनुस शेख हुसेन,शेख अतीक, मिर्झा कलीम बेग, सय्यद भिक्कन, शेरु शाहा, हमिद खां पठान, शेख सोहेल, जावेद कुरेशी, मजीद पठाण, शिकुर बेग, हारुन शेख, शेख सत्तार,उपस्थित होते .