ताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

समाजिक कार्यकर्ते मनोज फरके यांचा राष्ट्वादी शरद पवार गटात पक्ष प्रवेश

मनोज फरके यांचा राष्ट्वादी शरद पवार गटात पक्ष प्रवेश

आज आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदिप (भैय्या) क्षिरसागर, माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय राधाकृष्ण (आण्णा) होके पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब (भाई) शेख, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव काका गायकवाड पाटील यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजलगाव येथे प्रवेश केला.

देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार येत्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासासाठी व पक्ष संघटना वाढीसाठी पुरेपूर प्रयत्न करेल असा विश्वास देत आहे

या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार सय्यद सलीम भाई, शेतकरी नेते भाई गांगभिषण थावरे पाटील, नारायणराव डक,मनोहर तात्या डाके, माजी नगराध्यक्ष मंजूर भाई शेख,दयानंद भाऊ स्वामी, मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ घोडे, काँग्रेस पक्षाचे नारायणराव होके पाटील, भाऊसाहेब काका डावकर, डॉ भगवानराव सरवदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष भिमकराव काका हाडूळे यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.

Share now