पालिकेचे करअधीक्षक हमीद बागवान सेवानिवृत्त.
करअधीक्षक हमीद बागवान सेवानिवृत्त.
अंबड प्रतिनीधी :- अंबड नगर परिषदेचे कर अधीक्षक शेख हमीद भाई बागवान आज ३१ जुलै २०२३ रोजी सेवानिवृत्ती झाली असून यावेळी नगरपरिषद मध्ये नगरपालिका चे अधिकारी व कर्मचाऱ्याकडून सेवानिवृत्त गौरव करण्यात आला.हमीद बागवान हे विविध पदावर कार्यरत असतांना यांनी आपल्या जवळपास ३२वर्षाच्या सेवा कार्यकाळात अत्यंत सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन उल्लेखनीय सेवा बजावली आहे.
हमीदभाई बागवान यांनी गेवराई नगरपरिषद मध्ये २३ वर्ष सेवा बजवली यावेळी त्यांनी लेखा विभागामध्ये लेखापाल म्हणून काम केले तसेच माजलगाव नगरपरिषद मध्ये ४ वर्ष कार्यालयीन अधीक्षक काम बघितले त्यानंतर अंबड नगरपरिषद मध्ये ४ वर्ष कर निरीक्षक व कार्यालयीन अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला आता ते सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सेवानिवृत्त सत्कार मुख्याधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात
आला यावेळी नगर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री मनोज उकीर्डे ,ओ एस श्री इफ्तिकार शेख , अभियंता श्री सुशील भालेराव,ऋषिकेश जोशी, प्रवीण शिंदे,लेखापाल श्री विकास घावटे,जयसिंग ठाकरे,श्री विठ्ठल गोगरोड,श्री सांगळे,श्री देशपांडे,श्री देशमुख,श्री मकसूद, श्री चौधरी, श्री विनोद भाडमुखे, श्री विकास खरात,श्री अमर खरात,संतोष खरात, श्रीमती देशपांडे,श्रीमती रहाट गावकर,संजीव मैंद,शरद मगर,श्री दत्तात्रय शिंदे, आदी ची उपस्थिती होती.