मराठा आरक्षणाचा टिळा सुटल्यानंतर मुस्लिम आरक्षणासाठी लढा देणार
मराठा आरक्षणाचा टिळा सुटल्यानंतर मुस्लिम आरक्षणासाठी लढा देणार डॉक्टर कादरी.
माजलगाव प्रतिनिधी फिरोज इनामदार राज्यभरातील मराठा समाज आरक्षणासाठी संघटित झाला आहे या एकीतून मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी एम आय एम राज्यभर लढा उभारणार आहे अशी माहिती डॉक्टर गफार कादरी यांनी पत्रकार परिषदेत दिली एम आय पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर गफार कादरी माजलगाव येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते म्हणाले देशातील
मोदी सरकार अपयशी ठरल्याने त्यांच्याजवळ कोणताच मुद्दा राहिलेला नाही ते समाजा समाजामध्ये भांडणे लावत आहे सरकारचे नाकर्तेपणा झाकण्यासाठी हा सारा उद्योग सुरू आहे विशिष्ट समाजाला टार्गेट करून नागरिक कायद्याचा घाट घालत आहे अशी टीका डॉक्टर कादरी यांनी यावेळी केली मराठा आरक्षण वर बोलताना डॉक्टर गफार कादरी म्हणाले जालना जिल्ह्यातील जरांगे पाटलांचा आंदोलन चिरडून काढण्यासाठी राज्यातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेशाने लाटी हल्ला करण्यात आला नगर
जिल्ह्यातील दलित समाजाच्या तरुणांना झाडाला बांधून अत्याचार केला याबाबतीत सरकार सामान्य चे नसून दलित अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायावर अन्याय अत्याचार करत आहे कारण अल्पसंख्याक आणि दलितावर होणाऱ्या अन्याय बाबत ते काहीच बोलत नाही असा आरोप डॉक्टर कादरी यांनी केला मराठा आरक्षणाचे बाबतीत आमच्या पक्षाने जाहीर पाठिंबा दिलेला आहे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलनात केलेली आहे
पुढेही मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी एमआयएम पक्ष रस्त्यावर उतरणार आहे सध्या चालू असलेल्या मराठा आंदोलनाचा तिला सुटल्यानंतर एम आय एम पक्षाचे वतीने राज्यभर मुस्लिम आरक्षणाचा लढा उभा करणार असल्याचे डॉक्टर गफार कादरी यावेळी म्हणाले यावेळी उपस्थित एमआयएमचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते