क्राईमताज्या घडामोडी

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर अभद्र टिप्पणी केल्याच्या निषेधार्थ नेर कडकडीत बंद.

जालना प्रतिनिधी :- इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर अभद्र टिप्पणी केल्याच्या निषेधार्थ नेर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.घनसावंगी तालुक्यातील पाडुळी नाईक येथील नराधम गणराज नाईक पाटील याने स्व:ताच्या मोबाईल फोनवरून फेसबुक अकाऊंट माध्यमातून मोहम्मद पैगंबर व हजरत फातेमा यांच्या नावाने निच शब्दांचा वापर करून फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन महाराष्ट्रातील संपूर्ण मुस्लिम समाजात असंतोष निर्माण करुन त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे.तसेच त्याच्या या कृत्यामुळे हिंदू-मुस्लीम बांधवात तेड निर्माण करुन राज्यात दंगली घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रयत्न

केला.तसेच या कृत्य करणाऱ्या नराधमाच्या पाठीमागे कोणाचा हात आहे.याचीही तत्काळ चौकशी करण्यात यावी व हरामखोर गणराज नाईक पाटील याच्या तत्काळ गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन नेर येथील समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने सरपंच व ग्रामसेवक यांना देऊन निवेदनाद्वारे या अभद्र टिप्पणी बद्दल जाहीर निषेध करुन संपूर्ण नेर गाव कडकडीत बंद ठेवून या निवेदनाद्वारे शासनास विनंती करण्यात आली की या नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी.यावेळी गावातील संपूर्ण मस्जिदचे इमाम, राजकीय पुढारी आणि सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Share now