बदनापूर नगर पंचायत क्षेत्रात असलेल्या बदनापूर शहरात अनाधिकृत प्लॉटींगची कोणतीही परवानगी नाही
बदनापूर/प्रतिनिधी- बदनापूर नगर पंचायत क्षेत्रात असलेल्या बदनापूर शहरात अनाधिकृत प्लॉटींगची सुरु आहे. कोणतीही परवानगी न घेता भूखंडमाफियांकडून शेतजमिनीवर प्लॉटींग करुन प्लॉट विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरु असून, मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे बोलल्या जात आहे. बदनापूर शहरातील विविध भागात अनाधिकृतपणे प्लॉटिंग पाडून विक्री सुरु आहे. या प्लॉटींगसाठी सिमेंटचे रस्ते, ड्रेनेजलाईन आणि पाण्याची लाईन टाकण्यात येते आहे. एवढे होवून देखील नगर पंचायत प्रशासनाने स्वतः पुढाकार घेवून कारवाई करणार की केवळ बघ्याची भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बदनापूर शहरात शेतजमिनीवर कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतपणे प्लॉटींग पाडून सर्रास खरेदी-विक्री केली जात आहे. यामुळे प्लॉटींग विक्रेते हे शेतक-यांची जमीन स्वस्तात खरेदी करुन अनाधिकृतपणे प्लॉटिंग करुन त्याची विक्री सुरु आहे. गोरगरीब नागरिक स्वस्तात प्लॉट मिळत आहे असे म्हणुन खरेदी करत असून, त्याची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. बदनापूर शहरातील असंख्य जमीनीवर अनाधिकृतपणे प्लॉटींग करण्यात आली आहे. या प्लॉटिंगसाठी सिमेंटचे रस्ते, ड्रेनेजलाईन पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात येतात. मात्र नगर पंचायत कार्यालयाकडून ले-आउट परवानगी, गुंठेवारी व अन्य परवानगी घेण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. याकडे नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष देण्याची मागणी जोर धरीत आहे.