इस्लाम धर्माचे प्रेषित मुहम्मद (स.अ.स.) यांच्या बद्दल सोशल मीडियावर हरामखोराने आक्षेपार्ह पोस्ट
अंबड प्रतिनिधी :- घनसावंगी तालुक्यातील पाडोळी येथील हरामखोर गणराज नाईक पाटील याने त्याच्या फेसबुक अकाऊंट माध्यमातून इस्लाम धर्माचे प्रेषित मुहम्मद तसेच अल्लाह विषयी अत्यंत निच शब्दांचा वापर करून फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन संपूर्ण मुस्लिम समाजात असंतोष निर्माण करुन त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या
जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने शहरात पडसाद पडले असल्याने समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की जालना जिल्ह्यातील पाडोळी ता.घनसावंगी येथील दि.५ ऑक्टोबर रोजी गणराज नाईक पाटील या हरामखोराने फेसबुक अकाऊंट वरुन मुस्लिम समाजाचे प्रेषित मुहम्मद ( स.अ.स.) अल्लाह व हजरत फातेमा
यांच्या अभद्र अश्लील स्वरुपाचे अपमान जनक फोटो फेसबुकवर पोस्ट करुन त्यावर आक्षेपार्ह मजकूर टाकून जाणीव पूर्वक पोस्ट टाकले आहे.देशातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून व दोन समाजात तेढ निर्माण करुन दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रयत्न केला.तसेच या कृत्य करणाऱ्या हरामखोराच्या पाठीमागे कोणाचा हात आहे.याची तत्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अकबरी मस्जिद पासुन काढण्यात आला यावेळी हजारोच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोर्चा दरम्यान पोलिस निरीक्षक श्री आर.के.नाचण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.